Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगरपालिका निवडणुकीत सुमारे ५६.७६ टक्के मतदान

नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सुमारे ५६.७६ टक्के मतदान

२०१७ पेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी घट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १५) शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया बहुतांश ठिकाणी शांततेत पार पडली. काही केंद्रांवर मात्र रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. एकूण सुमारे ५६.७६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते, म्हणजे यंदा जवळपास ५ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

- Advertisement -

मतदान सकाळी ७.३० वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ५.३० पर्यंत मतदारांचा ओघ कायम राहिला. विशेषतः महिला आणि तरुण मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक केंद्रांवर सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसली, तर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला. बहुकोनी लढती आणि काही प्रभागांतील प्रतिष्ठेच्या थेट संघर्षामुळे मतदान केंद्रांवर गर्दी निर्माण झाली होती; मात्र प्रशासनाच्या नियोजनामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.

यंदाच्या निवडणुकीत ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ५२७ राजकीय पक्षांचे तर २०८ अपक्ष उमेदवार आहेत. बहुतांश प्रभागांत तिरंगी व चौरंगी लढती असल्याने मतदानाचा कल विभाजित होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. शांततेत मतदान पार पडावे यासाठी शहरातील २६६ संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याशिवाय ८,८०० अधिकारी व कर्मचारी, ४,८६० बॅलेट युनिट्स आणि १,८०० कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले होते.२०१७ मध्ये जास्त मतदान झाले असले तरी, यंदा राजकीय चुरस, मोठी उमेदवार संख्या आणि बदललेली प्रभाग रचना लक्षात घेता ५६.७६ टक्के मतदान समाधानकारक मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे.

असे झाले मनपासाठी मतदान
प्रभाग १ – ६०.७८ टक्के
प्रभाग २ – ६२.५५ टक्के
प्रभाग ३ – ५६.६४ टक्के
प्रभाग ४- ५२.८८ टक्के
प्रभाग ५ – ५५.५६ टक्के
प्रभाग ६ – ५९.८६ टक्के
प्रभाग ७ – ५३.९८ टक्के
प्रभाग ८ – ५५.४१ टक्के
प्रभाग ९ – ५७.२८ टक्के
प्रभाग १० – ६२.०२ टक्के
प्रभाग ११ – ५७.३६ टक्के
प्रभाग १२ – ५२.१० टक्के
प्रभाग १३ – ६०.१० टक्के
प्रभाग १४ – ५९.७१ टक्के
प्रभाग १५ – ५६.९३ टक्के
प्रभाग १६ – ५३.२३ टक्के
प्रभाग १७-५३.४५ टक्के
प्रभाग १८- ६१ टक्के
प्रभाग १९ -५८.४० टक्के
प्रभाग २० -५१.३३ टक्के
प्रभाग २१ – ४९.०८ टक्के
प्रभाग २२ – ६६.८५ टक्के
प्रभाग २३-५४.६० टक्के
प्रभाग २४ -५६.२० टक्के
प्रभाग २५ -५२.८४ टक्के
प्रभाग २६ – ५७.९३ टक्के
प्रभाग २७ – ५५.३५ टक्के
प्रभाग २८ – ५६.६७ टक्के
प्रभाग २९ – ५६.५३ टक्के
प्रभाग ३० – ५३.९९ टक्के
प्रभाग ३१-५७.३१
एकूण मतदान-५६.६७ टक्के

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...