Thursday, June 4, 2026
Homeक्रीडाकाव्या मारनने लिलावात खरेदी केलं, आता तोच अबरार म्हणतो, ना मी अस्वस्थ...

काव्या मारनने लिलावात खरेदी केलं, आता तोच अबरार म्हणतो, ना मी अस्वस्थ ना…

मुंबई | Mumbai
लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारनला ‘द हंड्रेड’ स्पर्धेत त्यांच्या सनरायझर्स लीड्स संघासाठी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला खरेदी केल्यामुळे प्रचंड द्वेष आणि टीकेला सामोरे जावे लागत आहे. काव्या मारनने अबरार अहमदला संघात घेतल्यानंतर भारतातून एकच संताप व्यक्त करण्यात आला. याचदरम्यान, आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अलीकडील द हंड्रेड स्पर्धेसाठीच्या लिलावात, सनरायझर्स लीड संघासाठी पाकिस्तानी स्टार खेळाडू अबरार अहमदला 1,90,000 पौंडांना खरेदी केले. या निर्णयानंतर, संघ व्यवस्थापन आणि मालकांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

ना तो त्याबद्दल चिंतीत ना अस्वस्थ
पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अंतर्गत सूत्रांनी ‘TelecomAsia’ला सांगितले की, अबरार अहमद या वादामुळे ना अस्वस्थ आहे, ना तो त्याबद्दल चिंतीत आहे. सनरायझर्सने अबरार अहमदला संघात घेतल्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांबाबत अबरार अहमदला काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण अशा प्रकारचा प्रतिसाद मिळणार याची अबरार अहमदला आधीच कल्पना होती. त्यामुळे या वादाबाबत मला अजिबात चिंता नसल्याची प्रतिक्रिया अबरार अहमदने दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील सदर विषय केवळ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि संबंधित फ्रँचायझी यांच्यापुरताच मर्यादित आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजारींचा मुलासह मृत्यू; इराणचा इस्रायलला मोठा इशारा

सनरायझर्सने भुमिका स्पष्ट केली होती
लिलावानंतर, प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्ट केले की, आदिल रशीदला खरेदी करता न आल्यामुळे त्यांना दुसऱ्या लेग-स्पिनरला लक्ष्य करावे लागले. ते म्हणाले, “आदिल रशीदला खरेदी करणे हे आमचे प्राधान्य होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे, आम्ही परदेशी फिरकीपटूंचे पर्याय शोधू लागलो. आम्ही 4-5 खेळाडूंचा विचार करत होतो आणि अबरार त्यापैकी एक होता. तो संघात आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.”

डॅनियल व्हेटोरीने हे देखील उघड केले की, संघाने कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याबाबत व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झाली नव्हती. पूर्वीच्या वृत्तांनुसार, आयपीएल संघ लिलावात पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष करतील असे म्हटले जात होते.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : स्विफ्ट कारसह एमडी ड्रग्ज बाळगणारी टोळी जेरबंद;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शहरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पंचवटी परिसरात कारमधून...