Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAbu Azami: ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते…’; भाषेबद्दल नेमकं...

Abu Azami: ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते…’; भाषेबद्दल नेमकं काय म्हणाले अबू आझमी काय म्हणाले?

सोलापूर | Solapur
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयानंतर मराठी भाषेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे, पहिलीपासून हिंदी भाषा नको यासाठी जोरदार विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात मनसेसह विरोधी पक्षांनी या मुद्द्याला विरोध केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याविरोधात मनसे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. आता यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी मोठे विधान केले आहे आहे.

मनसेने हिंदी भाषा सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरुन आता सपाचे नेते अबु आझमींचा तोल गेला आहे आहे. मराठीचा मुद्दा हा काय मुद्दा आहे का? असे अबू आझमी म्हणालेत. मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करु नका असेही ते यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले अबु आझमी?
‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे,’ असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संसदेत एक कमिटी आहे भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असते. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा सवालही यावेळी आझमी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरही आझमींनी भाष्य केले आहे. ‘ठाकरे बंधु एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहतील, त्यात आम्हालाही आनंद आहे.’ असे आझमी म्हणाले. तर ‘राज ठाकरेंची सध्या काही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचे राजकारण करतात. उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोलणे हा त्यांचा नेहमीचा धंदा झाला आहे,’ अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : अर्ज माघारीची मुदत संपली; ...

0
नाशिक | Nashik नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचे (Nashik Vidhan Parishad Election) चित्र आज (गुरुवारी) अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार...