Friday, September 20, 2024
Homeक्राईमसावदा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तीन नराधम अटकेत

सावदा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तीन नराधम अटकेत

सावखेडा/सावदा ।

- Advertisement -

सावदा (ता.रावेर) परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या ओळखीचा फायदा घेऊन, विद्यार्थिनीला मोटारसायकलीवर नेऊन पाशवी अत्याचाराची घटना सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे नुकत्याच झालेल्या बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली असून नराधमांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान या घटनेतील तीघ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील पीडित बालिकेला घटनास्थळी सोडून पळ काढलेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद केले आहे. या आरोपींना शनिवारी भुसावळ पोक्सो न्यायालयात हजर केले असता,दि.3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.30 रोजी दुपारी साडेचार वाजता सावदा परीसरातील शाळा सुटल्यावर पीडित अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी बसची वाट बघत असतांना,तीन आरोपी एका मोटरसायकलवर आले.त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या मामाच्या गावाच्या ओळखीचा फायदा घेऊन सावदा येथे पोहोचवतो असे सांगून मोटारसायकलीवर बसविले . त्यानंतर या नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीस घरी न सोडता सावदा-मस्कावद रस्त्यावर नेले व तेथे रस्त्याच्या बाजूने असलेल्या तुरीच्या व कपाशीच्या शेतात दोघांनी आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला तर एकाने तिचा विनयभंग करून घटनास्थळी अल्पवयीन पिडीतेला सोडून पळून दिलेे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा 173/2024, भारतीय न्यायसंहिता कलम 70(2),75(1)(1),3(5) सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधि.2012 चे कलम – 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सावदा पो. स्टे.ला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.


पोलिसांनी घेतली वेळीच दखल
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोस्टेचे स.पो.नि. विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी अवघ्या 3 तासात एका अल्पवयीन व दोन संशयित अशा तीन आरोपीना ताब्यात घेतले.यातील 2 संशियीत आरोपी बंटी उर्फ आरिफ इस्माईल तडवी,बंटी उर्फ किरण भीमराव मेढे यांना पोक्सो न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. 3 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्यावतीने राजू तडवी यांनी बाजू मांडली.यातील एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पुढील तपास स.पो.नि विशाल पाटील करत आहे. या आरोपींचा शोध लावण्यासाठी पीएसआय अमोल गर्जे , जयराम खोडपे,संजय तडवी यांनी कामगिरी पार पाडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या