नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड विभाग अंतर्गत (Ambad Division of Zone) येणाऱ्या अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हयांमध्ये हस्तगत केलेला १ कोटी ५६ लाख ३५ हजार ६११ रूपये किंमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त परिमंडळ २ किशोर काळे, सहायक आयुक्त, अंबड विभाग डॉ. सचिन बारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाणेत विविध गुन्हयातील हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आदेशीत केले होते. त्यानुसार अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महेश भवन येथे बोलावून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) कडील २१ गुन्ह्यातील ९३ लाख ६६ हजार ५०रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच अंबड पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले ७ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचे ४० मोबाईल फोन असा एकुण १ कोटी ९६ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वाटप करण्यात आला. इंदिरानगर पोलीस ठाणे कडील १० गुन्हयातील २१ लाख ८६ हजार ९१० रूपये किंमतीचा मुद्देमाल तसचे इंदिरानगर पोलीस ठाणे (IndiranagarPolice Station) हद्दीतून गहाळ झालेला १० हजार रुपये किंमतीचा १ मोबाईल फोन असा २१ लाख ९६ हजार ९१० रूपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वाटप करण्यात आला.
सातपुर पोलीस ठाणे (Satpur Police Station) कडील १४ गुन्हयातील ११ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वाटप करण्यात आला.एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे कडील ६ गुन्हयातील २१ लाख २६ हजार २५१ रूपये किंमतीचा मुद्देमाल तसचे एम.आय. डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेला ८० हजार किंमतीचे ५ मोबाईल फोन असा २२ लाख ६ हजार २५१ रूपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वाटप करण्यात आला. अंबड विभागातील ४ पोलीस ठाणे मिळुन १ कोटी ५६ लाख ३५ हजार ६११ रूपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादींना वाटप करण्यात आला.
दरम्यान, ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस ठाणे मनोहर कारंडे, सातपुर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण व अंबड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश नडविनकेरी, सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, तसेच अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे व एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.




