Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्हा परिषदेत ‘एसीबी’ची कारवाई; कार्यकारी अभियंता लाच घेताना अटकेत

नाशिक जिल्हा परिषदेत ‘एसीबी’ची कारवाई; कार्यकारी अभियंता लाच घेताना अटकेत

​नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. १८) रंगेहात पकडले. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील त्यांच्या दालनात ही कारवाई करण्यात आली.सायंकाळी सुमारे ५ वाजता ठाकरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.

बंधाऱ्याच्या कामाच्या सुमारे २० लाखांच्या देयकासाठी ठाकरे यांनी संबंधित ठेकेदाराकडे ८० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर व्यवहार ५० हजारांवर ठरला. याबाबत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला.

शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

रायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
पुणे |प्रतिनिधी| Pune रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या आळंदी येथील खाजगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी...