चांदवड | प्रतिनिधी Chandwad
राहुड घाटात आज शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर व पुढे जाणाऱ्या तीन ते चार कार व एक ट्रक व बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात उषा मोहन देवरे वय वर्षे 45 , राहणार भारत नगर, मालेगाव या महिलेचा मुत्यू झाला असून साधारण २० ते २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावेळी अपघातामुळे वाहतुकीस कोळंबाहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मदत कार्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत होती यावेळी 108 रुग्णवाहिका व सोमाटोलची रुग्णवाहिका तसेच टोल च्या अपघात विभागाने मदत कार्य केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते देखील उस्फुर्त पणे मदतीस धावून आले. उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.