Monday, July 6, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : महायुतीची 'सेफ हाऊस' पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही नगरसेवक...

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही नगरसेवक सहलीसाठी रवाना होणार

नाशिक | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक सहलीसाठी रवाना झाले आहेत. तर भाजपचे नगरसेवक दोन दिवसांनंतर स्वतंत्रपणे मुक्कामासाठी जाणार असल्याचे समजते.

- Advertisement -

नाशिक विधान परिषद निवडणुकीत निवडणुकीच्या तोंडावर मतदानात (Voting) कोणतीही गडबड किंवा क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. नाशिक महापालिकेत भाजपचे (BJP) ७२ तर शिंदे सेनेचे (Shinde Shivsena) २६ नगरसेवक आहेत.

महायुतीकडे (Mahayuti) स्पष्ट संख्याबळ असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदार एकसंघ राहावेत यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

महायुतीतील नेते मात्र नाशिकमध्ये (Nashik) कोणते ही नाराजीनाट्य नसून सर्व नगरसेवक एकजुटीने मतदान करतील, असा दावा करत आहेत. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नगरसेवकांच्या हालचालींवर सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक सहलीसाठी रवाना

महायुतीमधील शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विजयासाठी महायुतीने विशेष खबरदारी घेतली आहे. त्या पाश्वर्भूमीवर काल (शनिवारी) शिवसेनेचे जिल्ह्यातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...