Wednesday, June 10, 2026
HomeनगरAccident News : मोटारसायकल झाडावर आदळून तरुण ठार

Accident News : मोटारसायकल झाडावर आदळून तरुण ठार

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे कर्मचारी रामदास अर्जुन सुसे (वय 26) यांचा रविवारी रात्री झालेल्या मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील रहिवासी असलेले रामदास सुसे हे भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेत कार्यरत होते. रविवारी रात्री ते भेंडा येथून मोटारसायकलवरून गोंडेगाव येथील घरी जात होते. घरापासून काही अंतरावर असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर त्यांची मोटारसायकल धडकली.

- Advertisement -

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत रामदास घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना लिंबाच्या झाडाज वळ मोटारसायकलसह रामदास जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी सकाळी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजता गोंडेगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामदास सुसे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, नऊ महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...