Saturday, September 12, 2026
HomeनगरAccident News : राहुरी विद्यापीठ परिसरात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident News : राहुरी विद्यापीठ परिसरात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठ समोरील नगर-मनमाड महामार्गावर काल सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वर जागीच ठार झाला. मधुकर गुलाब डोके (वय 48, काळाणेवस्ती रा. आढळगाव, ता.श्रीगोंदा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

मधुकर डोके हे नगरकडून राहुरीकडे दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्‍या कंटेनर (क्रमांक एमएच 04 एचवाय 3427) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील डोके यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, मधुकर डोके हे श्रीगोंद्यातून गुहा येथे त्यांच्या भाच्याकडे जात असताना हा अपघात घडला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...