कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat
मुलीच्या लग्नानंतर पित्याचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24 डिसेंबर) घडली. याबाबत माहिती अशी, कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी हीचा विवाह केदार जगताप यांच्यासोबत मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मंगळवारी (24 डिसेंबर) दुपारी दोन वाजता झाला.
- Advertisement -
यानंतर वैष्णवी हिस सासरी जाण्यासाठी निरोप दिला आणि बाळासाहेब सूर्यवंशी, नातेवाईक दिनेश सदाशिव कागदे (रा.इंदूर, मध्यप्रदेश) हे गुरवपिंपरी येथील घरी येत असताना ट्रॅक्टरची व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.