Monday, July 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजेजुरीजवळ भीषण अपघात! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघांचा मृत्यू

जेजुरीजवळ भीषण अपघात! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघांचा मृत्यू

जेजुरी | Jejuri
पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीमध्ये सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडले. जेजुरीतील महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा परिसरात हा अपघात झाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. जेजुरीत पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. ‘अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत. अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

- Advertisement -

मृतांमध्ये, राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत. वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर ७० वर्षांचा असून त्याने तापाच्या गोळ्या घेतल्याने ग्लानी आली. त्यानंतर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला असल्याची माहिती मिळाली.

संपादकीय : १३ जुलै २०२६ – आर्थिक बेशिस्तीचा चिंतनीय आरसा

दरम्यान, जेजुरीत पालखी दाखल झाल्यावर पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. अशातच हा दुर्दैवी अपघात झाला. वारीमधीलच ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत घुसल्याने ट्रकने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि सर्वांची पळापळ झाली.

जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे? याचा तपास पोलीस करत आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली तसेच पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमींवर तातडीने व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत तसेच आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

त्यानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

ताज्या बातम्या

सरकारला सोनम वांगचुक यांना मारायचंय का? उपोषणावरून संजय राऊत यांची केंद्र...

0
मुंबई । Mumbai प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासुन उपोषणावर बसले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या उपोषणावरून आता...