Thursday, October 22, 2026
Homeमुख्य बातम्याAccident News : साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला; अपघातात वऱ्हाडींसह १२ ठार

Accident News : साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला; अपघातात वऱ्हाडींसह १२ ठार

पालघर | वृत्तसंस्था | Palghar

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावाजवळ (Dhanivari Village) झालेल्या भीषण अपघातात (Accident News) १२ जणांचा मृत्यू (Death) झाला. डहाणू तालुक्यातील (Dahanu Taluka) बापूगाव येथून धानिवरी येथील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला एका वेगवान कंटेनरने जोरदार धडक दिली.

- Advertisement -

ही धडक एवढी भीषण होती की, कंटेनरचे पुढचे केबिन मुख्य बॉडीपासून वेगळे होऊन थेट वऱ्हाडाच्या ट्रकवर कोसळले. यामुळे ट्रकमधील अनेक लोक कंटेनरच्या (Container) वजनाखाली दबले गेले. याच दरम्यान महामार्गावरून जाणारी एक दुचाकीही या वाहनांच्या कचाट्यात आली. या दुर्दैवी अपघातात दुचाकीवरील दोन प्रवाशांसह ट्रकमधील १० अशा एकूण १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच खासदार हेमंत सावरा (MP Hemant Savra) यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघातात जखमींना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले .

ताज्या बातम्या

पडसाद : दादा, जरा शिक्षण खात्याकडेही लक्ष द्या!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यभर नाशिकच्या शिक्षण विभागाच्या कारनाम्यांची लक्तरे वेशीवर टांगली जात असतांनाही हे खाते...