Thursday, May 7, 2026
HomeनगरAccident News : भीषण अपघातात चुलती-पुतणीचा मृत्यू

Accident News : भीषण अपघातात चुलती-पुतणीचा मृत्यू

टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी घाटात टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण धडकेत दुचाकीवर प्रवास करणार्‍या चुलती-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.5) सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जया दत्तू थोरात (वय 35) आणि अस्मिता दादा थोरात (वय 16, दोघी रा. मोधळवाडी, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. टेम्पो (क्र.एमएच.42, बीएफ.9094) चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या धडकेत दोघींना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व पोलिसांना माहिती दिली.

जखमी अवस्थेत दोघींना घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत जया थोरात यांचे पती दत्तू बबन थोरात यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन वरील टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळगाव देपा व मोधळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

डोकाडिया

कलिंगडमुळे नाही तर ‘या’ औषधामुळे ‘त्या’ चार जणांचा मृत्यू; पायधुनीतील डोकाडिया...

0
मुंबई | Mumbaiमुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने...