Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJay Pawar: २०२९मध्ये सुनेत्रा पवारच बारामतीतून उमेदवार अन् मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार; जय पवारांचं...

Jay Pawar: २०२९मध्ये सुनेत्रा पवारच बारामतीतून उमेदवार अन् मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार; जय पवारांचं मोठं वक्तव्य

बारामती | Baramati
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यामुळे, सध्यातरी अजित पवारांच्या राजकीय वारसदार सुनेत्रा पवार आहेत. मात्र, बारामतीत मतदानाच्यादिवशीच 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? याची चर्चा रंगली होती. रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरले.

परंतु, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी पुन्हा पवार विरुद्ध पवार, अशी लढत होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलेले. यातच आता २०२९ मधून पुन्हा सुनेत्रा पवारच निवडणूक लढतील. त्यासह २०२९ मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, असे विधान जय पवार यांनी केले आहे. जय पवार यांनी बारामतीत जनता दरबार घेतला होता. त्यानंतर जय पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

काय म्हणाले जय पवार?
सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने येथील जागा रिकामी झाली असून तिथे तुमचे नाव चर्चेत आहे, असा प्रश्न विचारला असता, चर्चा होतेय पण मी इथेच सर्वांसाठी काम करेल, असे म्हणत जय पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही जय पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचे आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटते 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.

Nashik TCS: धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा कट? निदा खानवर नव्या गुन्ह्याची नोंद

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही बारामतीकरांसह राज्यातील अनेकांची इच्छा होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र, आता सुनेत्रा पवार ह्याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बारामतीकर बाळगत आहेत. त्यातच, आज जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार ह्याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या उमदेवार म्हणून त्या निवडणूक लढवती अशी आम्हाला आशा असल्याचेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...