Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik TCS: धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा कट? निदा खानवर नव्या गुन्ह्याची नोंद

Nashik TCS: धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा कट? निदा खानवर नव्या गुन्ह्याची नोंद

नाशिक | प्रतिनिधी
टीसीएस कंपनीतील बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचे प्रकरणात एक मोठे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सक्रिय असल्याचा संशय नाशिक जिल्हा न्यायालयाने व्यक्त केला होता तर, आता विशेष तपास पथकाच्या तपासात या संशयाला वाव देणारे पुरावे हाती आले असून, संशयितांनी दोन सॉफ्ट टार्गेट निवडून अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटात आता संशयित निदा खानचा सहभाग निष्पन्न झाल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरूख कुरेशी, रझा मेमन आणि फरार संशयित निदा खान यांनी कंपनीतील एका तरुण आणि एका तरुणीला सॉफ्ट टार्गेट म्हणून हेरले होते. या दोघांचे धर्मांतर करण्याची जबाबदारी वाटून घेण्यात आली होती, असे धक्कादायक पुरावे एसआयटीने शोधले आहेत. तरुणाच्या धर्मांतराची ही जबाबदारी तौसिफ आणि दानिशकडे होती. त्याला वारंवार हॉटेल्समध्ये नेऊन मांसाहार करण्यासाठी बळजबरी करण्यात आली. तर, पीडितेवर इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये आणि टेकडी परिसरात अत्याचार करण्यात आले.

- Advertisement -

यासाठी दानिशने ३ हजार २०० रुपयांत रूम बुकिंग केले होते, असे उघड झाले आहे. पीडितांच्या धर्मातील देवदेवतांबद्दल खोटी माहिती पसरवून, त्यांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न होता. पोलिसांनी पीडितेकडून विशिष्ट धार्मिक पोशाख, बुरखा, पुस्तके, मोबाईल ॲप्स आणि काही संशयास्पद लिंक्स जप्त केल्या आहेत. न्यायालयाने हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटल्याने, या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले आहेत का, याचा तपास सुरू झाला आहे.

Sanjay Raut: “आया-बहिणींचे कपडे फाडून…”; रिंग रोडच्या भूसंपादनावरुन संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

पॉश समितीचा निष्काळजीपणा
या प्रकरणात कंपनीच्या प्रशासकीय त्रुटीही समोर आल्या आहेत. नाशिक कार्यालयात ५० पेक्षा जास्त महिला कर्मचारी असूनही स्वतंत्र पॉश (लैंगिक छळ प्रतिबंधक समिती) नव्हती. पुणे आणि नाशिकसाठी एकच समिती असल्याने तक्रारींची दखल घेतली गेली नाही. या समितीची सदस्य अश्निनी चैनानी हिने पीडितांच्या तोंडी तक्रारींकडे दुर्लक्ष करत “तुमको हायलाईट होना है क्या ?” असे म्हणत त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर बाबीची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.

कायदेशीर कारवाईचा बडगा
या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असून, बहुतांश मुख्य संशयित कारागृहात आहेत. निदा एजाज खानचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून, एसआयटीने तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट रचणे) समाविष्ट केले आहे. या कलमांतर्गत मृत्यूदंड किंवा जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...