Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकलिंगडमुळे नाही तर 'या' औषधामुळे 'त्या' चार जणांचा मृत्यू; पायधुनीतील डोकाडिया कुटुंबियांच्या...

कलिंगडमुळे नाही तर ‘या’ औषधामुळे ‘त्या’ चार जणांचा मृत्यू; पायधुनीतील डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूचं कोडं उलगडलं

मुंबई | Mumbai
मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाली. त्यातच चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होत. या चौघांच्या मृत्यूसाठी कलिंगड कारणीभूत आहे का, याची चौकशी सुरू झाली होती. अखेर 11 दिवसांनी मृत्यूचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.

डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूसाठी कलिंगडातील भेसळ कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नव्या अहवालाने या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चौघांच्याही शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं झिंक फॉस्फाईट सापडले आहे.

- Advertisement -

Jay Pawar: २०२९मध्ये सुनेत्रा पवारच बारामतीतून उमेदवार अन् मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार; जय पवारांचं मोठं वक्तव्य

२६ एप्रिल रोजी अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणात अब्दुल्ला डोकाडिया (44) त्यांची पत्नी नसरीन (35) आयेशा (16) आणि झैनब (13) यांचा अचानक मृत्यू झाला होता.

शरिरात झिंक फॉस्फाईट आढळले
मुंबईतील पायधुनीमधील डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूचं कोडं अखेर उलगडलं आहे. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्या चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळलं आहे. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...