Monday, September 28, 2026
HomeनगरAccident News : पिकअप-दुचाकीच्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी

Accident News : पिकअप-दुचाकीच्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील राजूर येथे कोल्हार-घोटी मार्गावर मातोश्री मिलजवळ सोमवारी (दि.12) सायंकाळी दुचाकी व पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

नितीन लक्ष्मण पथवे (वय 25) व शिवाजी रामदास जाधव (वय 24, दोघेही रा.जामगाव) असे जखमी तरुणांची नावे आहे. या अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअपने समोरून जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. हे दोघे राजूरहून अकोलेच्या दिशेने जात होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण समजले नाही. परंतु, कोल्हार-घोटी मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गांजा कारवाईतील तक्रारीनंतर चार अंमलदारांच्या बदल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कोतवाली पोलिसांनी केलेल्या कथित गांजा कारवाईतील कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक...