Wednesday, June 10, 2026
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी-राहुरी स्टेशन रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहन व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात हॉटेलमध्ये काम करणार्‍या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 11 जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसून आले. संतोष संजय माळी (वय 18) मूळ रा. करंजी घाट, केळ पिंपळगांव हा तरुण राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार होता.

- Advertisement -

तो सध्या राहुरी स्टेशन परिसरातील गावठाण येथे राहत होता. तो 11 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेदरम्यान आपल्या घराकडे रेल्वे स्टेशन येथे जात असतान एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतोष माळी याला रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षिरसागर यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. संतोष माळी याच्या मृतदेहाचे 12 जानेवारी रोजी सकाळी विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी : हेमंतदास महाराज

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी...