Saturday, May 2, 2026
HomeनगरCrime News : सराईत आरोपींकडून अकरा लाखांच्या 9 दुचाकी जप्त

Crime News : सराईत आरोपींकडून अकरा लाखांच्या 9 दुचाकी जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी सराईत आरोपींकडून 11 लाखांच्या 9 दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे.
स्वप्निल संतोष भारुड, रा.सवनसर, ता.कोपरगाव, युवराज विलास खरात रा. भोजाडे चौकी, ता.कोपरगाव, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तालुक्यातील खंडाळा येथील संकल्प राजेंद्र सोनवणे यांनी दि.8 ऑक्टोंबर 2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची श्रीरामपूर शहरातील सी.के.वाईन्सच्या समोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

- Advertisement -

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील दुचाकीचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. दि.26 में रोजी तपास पथकातील पोलिसांना अशोकनगर फाटा परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेट असलेली बजाज पल्सर कंपनीच्या दुचाकीवरून संशयितरीत्या फिरतांना दिसल्याने त्याला अडवून त्याला त्याचे नाव व गाडीबाबत विचारपुस केली असता. त्याने त्याचे नाव स्वप्निल संतोष भारुड (रा. संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

तसेच चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सी.के. वाईन समोरुन युवराज विलास खरात (रा.भोजाडे चौकी, ता. कोपरगाव) याच्या मदतीने एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तेव्हा युवराज विलास खरात याला ताब्यात घेवून दोघांकडे विचारपुस केली असता. त्यांनी संगमनेर, घारगाव, लासलगाव, आळेफाटा परिसरातून व अन्य ठिकाणाहुन एकुण 9 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तपास पथकाने अहिल्यानगरमधील व छत्रपती संभाजीनगर जिल्हयात जावून 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...