पोलीसांनी तालुक्यातील सोनबर्डी व काढोली येथे गावठी दारू विक्रेत्यांवर छापा टाकुन धडक कारवाई करून त्यांच्याकडील रसायने ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील सोनबर्डी शिवारात अंजनी नदीच्या काठावर रतिलाल तुळशीराम मोरे वय 45 राहणार सोनबर्डी हा दारू तयार करण्यास उपयुक्त गुळ, नवसागर भट्टी साधन रचुन दारू पाडत असल्याची बातमी मिळाल्यावर दिनांक 7/4/2020 रोजी आठ हजार रुपये किमतीचे दोनशे लिटर कच्चे रसायन,दोनशे लिटर पक्के रसायन,रक्कम रुपये पाचशे मिळून आले व त्यांना ताब्यात घेतले.
याच बरोबर कढोली येथील भास्कर झिंगा कोळी वय 55 हा हातभट्टी दारू तयार करून व ती जवळ बाळगून तिची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर दिनांक 7/4/ 2019 रोजी छापा टाकून 35 लिटर दारू किंमत रक्कम रुपये 1700/ जप्त करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रोजन क्रमांक 65 की प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद कुमावत,राहुल बैसाणे,काशिनाथ पाटील यांनी कारवाई केली आहे.




