Tuesday, April 28, 2026
HomeनाशिकAshok Kharat Crime News : खरातचे 'पंटर'च बनले कर्दनकाळ; साडेआठ कोटींच्या खंडणीप्रकरणी...

Ashok Kharat Crime News : खरातचे ‘पंटर’च बनले कर्दनकाळ; साडेआठ कोटींच्या खंडणीप्रकरणी पोफळेंची भोंदूविरोधात फिर्याद

नाशिक | Nashik

एकेकाळी अशोक कुमार खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ याच्या गळ्यातील ताईत असलेले त्याचेच निकटवर्तीय आता त्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आणि अघोरी प्रथांचा आधार घेत तब्बल आठ कोटी ७६ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी वरळीचे व्यावसायिक ललित प्रकाश पोफळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात शुक्रवारी रात्री फिर्याद (FIR) दिली आहे. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच पोफळे यांनी शहर आयुक्तालयात अर्ज दिला होता, ज्याची दखल घेत आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

अशोक खरात याने आपल्या कथित दैवी शक्तीच्या बळावर अनेकांना भुरळ घातली होती. पोफळे हे देखील त्याच्या ‘शिवनिका संस्थान’मध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत होते. मात्र, खरातच्या अनैतिक कृत्यांचा सुगावा लागताच पोफळे यानी ८ ऑगस्ट २०२५ रोजीच विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. खरातने पोफळे यांना त्यांच्या आई-वडिलांच्या (Mother and Father) मृत्यूची भीती घातली होती. हा ‘मृत्युयोग’ टाळण्यासाठी वावी येथील दर्यात आणि तिरुवनंतपुरमच्या समुद्रकिनारी ‘अवतार पूजा आणि सिद्ध पूजा’ करण्याचे नाटक रचून कोट्यवधी रुपये उकळले. तपासादरम्यान खरातने पोफळे हे त्याचे सीए (CA) असल्याचे भासवले होते. मात्र, पोफळे यांनी केवळ ‘बँकिंग लोन कन्सल्टंट’ असून खरातचे सीए म्हणून कधीही काम केलेले नाही, असे स्पष्ट करीत खरातचे आर्थिक व्यवहार प्रशांत पाळदे आणि किरण कटारिया हे पाहत असल्याचा खुलासा केला आहे.

सोलापूरात जमीन खरेदी

सन २०२४ मध्ये ‘शक्तीपीठ महामार्ग’ एका विशिष्ट जमिनीतून जाणार असून त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडतील, असे खोटे आमिष खरातने पोफळे यांना दाखवले. या आमिषाला बळी पडून त्यांनी पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात त्या भागातून कोणताही महामार्ग प्रस्तावित नसल्याचे नंतर समोर आले. तिरुवनंतपूरम येथील प्रवासादरम्यान खरातने समुद्राच्या पाण्यातून नाग प्रकट होत असल्याची हातचलाखी केली. मात्र, पोफळे यांनी प्रत्यक्ष पाहिली होती.

खरातची ‘मोडस ऑपरेंडी’

विश्वास संपादन – स्वतःला समुद्रशास्त्र आणि अंकशास्त्राचा जाणकार सांगून जाळ्यात ओढणे
दहशत निर्माण करणे – कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूची भीती घालणे.
आर्थिक लूट – मृत्यूयोग टाळण्याच्या नावाखाली ‘खंडणी’ स्वरूपात कोटींच्या रकमा उकळणे.
बनावटगिरी – बंद फोनवर बड्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचे नाटक करून प्रभाव पाडणे.

मुद्दे

  • अघोरी पूजेचे दर : पोफळेंच्या आईच्या आयुरारोग्यासाठी ४.२५ कोटी आणि वडिलांच्या पूजेसाठी ५ कोटींची मागणी.
  • बनावट चमत्कार : हाताच्या मुठीतून काजुकतली काढणे आणि अंधारात ‘नकली सापांचा’ वापर करून नागदेवता प्रकट झाल्याचा बनाव.
  • शक्तीपीठ महामार्गाच खोटे आमिष दाखवून जमिनीची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
  • सर्व आर्थिक व्यवहार आरटीजीएस आणि ऑनलाइन स्वरूपात असल्याने पोलिसांकडे पुरावे उपलब्ध.

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२६ – ट्रम्प यांची ‘नरक’वारी अन् भारताची...

0
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर स्थायी मित्र किंवा स्थायी शत्रू नसतात, असतात ते फक्त स्थायी हितसंबंध, हे वचन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...