Sunday, June 14, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे 'डर्टी पिक्चर्स'; 'सीसीटीव्ही' बंद...

Ashok Kharat Crime : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’; ‘सीसीटीव्ही’ बंद ठेवण्याची सक्ती अन् कूकचा खुलासा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःला अवतार मानणाऱ्या अशोक खरातचे (Ashok Kharat) काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या ‘आतल्या गोटातील’ माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले आहे. खरातच्या बेडरूमसह फार्म हाऊसवरील अश्लील चाळ्यांपासून ते भक्तांच्या लुटीपर्यंतचा काळा चिट्ठा १६० जीबीच्या पुराव्यासह सर्वप्रथम शिर्डी पोलिसांच्या टेबलावर पोहोचला होता.

- Advertisement -

खरात प्रकरणाची सुरुवात त्याच्या सिन्नरमधील (Sinnar) मिरगावच्या फार्म हाऊसवरील (Mirgaon Farm House) एका कूकपासून झाली. खरात तेथे येण्यापूर्वी कूकला सीसीटीव्ही बंद करण्यास सांगत असे. मात्र, कूकने केवळ संशयावरून नव्हे तर प्रत्यक्ष डोळ्यांनी खरातचे महिलांसोबतचे अश्लिल वर्तन आणि नशेत केलेले कृत्य पाहिले होते. हा कूक खरातच्या दहशतीखाली होता, मात्र त्याने ही माहिती खरातच्याच एका जवळच्या चालकापर्यंत (ड्रायव्हर) पोहोचवली आणि तिथूनच या भोंदूच्या अंताची ठिणगी पडली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातचे ‘पंटर’च बनले कर्दनकाळ; साडेआठ कोटींच्या खंडणीप्रकरणी पोफळेंची भोंदूविरोधात फिर्याद

खरातचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सर्वात मोठी जोखीम ऑफिस बॉयने उचलली. खरातच्या कार्यालयात आणि वैयक्तिक केबिनमध्ये त्याने गुपचूप ‘स्पाय कॅमेरा’ बसवला. उमाकांत तायडे यांच्या मदतीने या कॅमेऱ्यात जे काही चित्रित झाले, ते पाहून खरातचे तत्कालिन बडे समर्थकही हादरले. या व्हिडिओमध्ये (Video) खरात महिलांसोबत अश्लिल चाळे करताना आणि लोकांना फसवताना स्पष्टपणे कैद झाला. हे पुरावे मिळताच खरातच्या दहशतीला न जुमानता ऑफिसबॉयला राजेंद्र जासूद, दिनेश परब आणि ललित पोफळे यांनी मानसिक आधार दिला व हे प्रकरण शिर्डी पोलिसांपर्यंत पोहोचले.

भक्तांनीच काढली ‘धिंड’

एकेकाळी खरातला देव मानणारे राजेंद्र जासूद आणि इतर भक्तांनी जेव्हा त्याचे सत्य पाहिले, तेव्हा त्यांनीच या पापाचा घडा फोडण्याचे ठरवले. अशोक भालेराव यांच्या माध्यमातून १६० जीबी डेटा पोलिसांना देऊन त्यांनी खरातची रवानगी कोठडीत केली. सध्या पोलीस या व्हिडिओंची तांत्रिक तपासणी करत असून, या माध्यमातून अनेक बड्यांची नावे फुटण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Temperature News : उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला; पारा तब्बल ‘इतक्या’ अंशावर

खरातला सहाव्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी

नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) त्याला सातव्या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी रीतसर अर्ज सादर केला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...