Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray: "महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत..."; मनसे-शिवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सुचक...

Aaditya Thackeray: “महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत…”; मनसे-शिवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सुचक विधान

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर या दोन पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. पाठोपाठ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेसोबतच्या युतीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मनसेला युतीबाबत सूचक विधान केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे.

- Advertisement -

आमचे मन साफ
यावेळी आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. अलीकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

सर्वांच्या मनातली बातमी लवकरच कळेल
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेले नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल”.

ठोस कृती करायला हवी
दरम्यान, माझ्या माहितीप्रमाणे अद्याप कोणताही प्रस्ताव मनसेकडे आलेला नाही. जर प्रस्ताव आला, तर त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. आम्ही सकारात्मक आहोत, हे केवळ बोलून चालणार नाही, खरेच सकारात्मक असतील, तर त्याबाबतची ठोस कृती करायला हवी. कृती कुठेही दिसत नाही. नुसती बोलाची कढी अन् बोलाचा भात असे सुरू आहे. प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. कृती झाली तर राज ठाकरे निर्णय घेतील. ठाकरे ब्रँड संपवायचा कुणीही प्रयत्न केला, तरी जोपर्यंत राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

default-featured-image

Baramati By Election Result 2026 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामती पोटनिवडणुकीत...

0
मुंबई | Mumbai दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी (दि.२३ एप्रिल रोजी) मतदान झाले होते....