Monday, November 23, 2026
HomeनगरAhilyanagar : विरोधकांच्या दडपशाहीला जनता थारा देणार नाही- ना. विखे पाटील

Ahilyanagar : विरोधकांच्या दडपशाहीला जनता थारा देणार नाही- ना. विखे पाटील

भाजपचा नगरमध्ये मोर्चा || काँग्रेससह राहुल गांधीे यांच्यावर सडकून टीका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा हा निर्धार आहे. हा देश संसदेतून चालेल परदेशातून नाही. तुमच्या धाक दडपशाहीला देशातील जनता थारा देणार नाही असा इशारा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी अहिल्यानगर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप दिल्लीगेट येथे जाहीथ सभेने करण्यात आला. सभापती राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. अक्षय कर्डीले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकरी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर सडकून टिका केली. वर्षानुवर्ष देशात कॉग्रेसची राजवट होती. पण त्यांना संविधान दिन साजरा करावासा वाटला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून भारताच्या संविधाना प्रति असलेला आदर दाखवून दिल्याकडे लक्ष वेधून अहिल्यानगर जिल्हा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते खूप वेगळे होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून काँग्रेसला इशारा देतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, हा देश संविधानाच्या आधाराने पुढे जाईल.तुमच्या धाक दडपशाहीने नाही. मागील काही दिवसात या देशामध्ये कॉग्रेस आणि त्यांच्या काही मित्र पक्षांनी संविधानाच्या नावाखाली केवळ अराजक माजवून देशातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

काँग्रेसच्या भूमीकेला आता कोणताही आधार राहीलेला नाही. ज्यांच्याकडे कोणताही विचार आता शिल्लक नाही. सातत्याने निवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवाने कॉग्सेस नेते हतबल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील बारा वर्षात देशाने सर्वच क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीमुळे भारत देश महासतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.पण काही परदेशी शक्तीना हे पाहावत नाही. म्हणूनच परदेशी शक्तीच्या जोरावर देशाला बदनाम करण्याचे काम काँग्रेसकडून सातत्याने सुरू असल्याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला. संविधान हातात घेवून राहूल गांधी फिरत आहेत. पण देशातील जनता एवढी दूधखुळी नाही.

संविधानाची आजपर्यत काँग्रेस पक्षाने कशी पायमल्ली केली हे देशाने चांगले ओळखले आहे. लोकसभेची मागील सर्व अधिवेशन आपण पाहीली. महत्वाच्या विषयावरील एकाही चर्चेत कॉग्रेस पक्ष सहभागी झाला नाही. संविधानाच्या आधारे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारत घडवायचा आहे. जिथे गरिबाला न्याय मिळेल, शेतकर्‍याला सन्मान मिळेल,युवकांना रोजगार मिळेल आणि प्रत्येक नागरिकाला विकासाच्या संधी मिळतील. राजकारणा पेक्षा राष्ट्रहित महत्वाचे असल्याचे मंत्री विखे सांगितले.

चोख उत्तर देण्यासाठी ही रॅली – सभापती शिंदे
सभापती शिंदे यांनी आपल्या भाषणात अतिशय त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य लोकशाही मध्ये परावर्तित झाले आहे. निवडणुकांमध्ये पराभव होतो. लोकांना विचार पटत नाही, तेव्हा विरोधी पक्ष म्हणून सुध्दा भूमिका करता आला पाहीजे. दुर्दैवाने देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानिक संस्थांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. जनतेचा कधीच विचार न केलेल्यांना चोख उतर देण्यसाठी ही रॅली असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. विरोध सभागृह सोडून बाहेर गटवर आंदोलन करत आहेत. यामुळे गरज असल्यास सत्तेत असतांना सुध्दा आंदोलन करण्याची वेळ आल्यास भाजप मागे हटणार नाही, असा इशारा दिला. याप्रसंगी आ. राजळे आ. कर्डिले, डॉ. विखे पाटील यांची भाषणे झाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कारखानदारांऐवजी बळीराजाच्या मुलांना बिनव्याजी कर्ज द्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. त्यामुळे या बँकेने साखर कारखानदारांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध...