नाशिक | प्रतिनिधी Nashik
नव्या शैक्षणिक धोरणाला सुरूवात करुन केंद्र सरकारने मागील अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण केली आहे. आता सहा नाही तर तीन वर्षाचा मुलगा शाळेत प्रवेश घेणार आहे. नव्या शिक्षण पद्धतीने आमूलाग्र बदल आगामी काळात दिसतील.नालंंदा विद्यापीठ पुन्हा कार्यान्वित झालेले दिसेल, असे प्रतिपदान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाकडून कै. माधवराव लिमये स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार आज राज्यपाल बागडे यांच्या हस्ते माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार यांना देण्यात आला. त्यावेळी बागडे बोलत होते.
बागडे यांनी आपल्या भाषणात नाशिकचे महत्त्व अधोरेखित केले. नाशिक शहरात काळाराम मंदिर आहे. त्याच मंदिरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर येऊन गेले. मी नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रजांना भेटलो होतो. अन्नपुरवठा मंत्री असतांनाकुसुमाग्रजांंची कविता रेशन कार्डवर छापली होती, असे ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आम्ही संघात काम करायचो तेव्हा लोक आम्हाला हिंणवायचे. काळ्या टोप्या घालणारे म्हणायचे. आम्ही मोठा संघर्ष केला. आज आम्हाला ङ्गअच्छे दिनफ दिसत आहेत. इंग्रजांना जास्त काळ भारतावर राज्य करता येणार नाही हे समजले होते. म्हणूनच त्यांंनी त्यांच्या सोयीची शिक्षणपद्धत अमलात आणली होती. आता कोठे 1,400 तज्ञांनी बनवलेली नवी शिक्षणपद्धती अमलात येणार आहे. त्याचे चांगले परिणाम आगामी काळात दिसल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांची छायाचित्रे असल्याचा दावा केला.
यावेळी निवड समितीे सदस्य अभिजित कुलकर्णी, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांंची भाषण झाले. सूत्रसंचालन गिरीश नातू यांनी केले. परिचय संजय करंजकर यांनी करुन दिला. देवदत्त जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले.अॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक केले. प्रेरणा बेळे यांनी आभार मानले.
यावेळी आ. सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आर्चिस नेर्लीकर, वैद्य विक्रांंत जाधव, डॉ. सुनील कुटे, जयेश बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, सुरेश गायधनी, डॉ. धर्माजी बोडके, प्रा.सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, अॅड. भानुदास शौचे आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.