Sunday, May 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभूसंपादन प्रक्रिये विरोधात बाधित शेतकरी करणार आमरण उपोषण

भूसंपादन प्रक्रिये विरोधात बाधित शेतकरी करणार आमरण उपोषण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

भूसंपादन विरोधात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवार (दि. २६ मे) पासून पंचवटी येथील रामकुंड येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर, अ‍ॅड. कैलास खांडबहाले व विनोद नाठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी तसेच भूसंपादनाशी संबंधित विभागीय मंत्र्यांना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. रिंग रोडसाठी नवीन भूसंपादन करण्याऐवजी पूर्वीच्या विकास आराखड्यातील डीपी रोडचा पर्याय का वापरला गेला नाही, असा सवाल करत दुहेरी भूसंपादनामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रिंग रोड भूसंपादनात विविध गावांमध्ये मोबदल्यामध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बेळगाव ढगा परिसरात उच्च दराने मोबदला देण्यात येत असताना गौळणे परिसरातील शेतकऱ्यांना कमी दर देण्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला.

दरी-मुंगसारा येथे महिला शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीचा तसेच गौळणे येथे मोबदला न देता सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत प्रशासन व पोलिसांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. “शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दादागिरीच्या पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेस संतोष सहाणे, विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर चौधरी, राजू जाधव, भास्करा उगले यांच्यासह परिसरातील १७ गावांतील बाधित शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik News : कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिककरांना वेठीस धरू नका – सरकारवर...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik कुंभमेळ्यासाठी कुणाचाही विरोध नाही मात्र कामांचे ठेके कुठल्या राज्यातील कंपन्यांना दिले, त्यातून नाशिकला काय फायदा झाला आणि पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते नागरिकांसाठी...