Sunday, November 8, 2026
HomeनगरAhilyanagar : कृषी विद्यापीठातील पद भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी

Ahilyanagar : कृषी विद्यापीठातील पद भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2025 मध्ये करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी कृषी विद्यापीठाशी संबंधित विषयांबाबत बैठक झाली. या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतीक्षा पाटील, वित्त आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजेंद्र पाटील आणि कुलगुरू डॉ. विलास खर्चे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

- Advertisement -

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठा मधील प्रकल्पग्रस्त प्रतीक्षा यादीतील प्रकल्पग्रस्त कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत सामावून घेतले घेतल्यामुळे जुनी पेन्शन लागू झाली नाही, त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी 2025 मध्ये वर्ग क आणि वर्ग ड मधील पद भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण पदांवरील नियुक्ती , ई डब्ल्यू एस व एस सी बी सी प्रवर्गातील पदांवरील उमेदवारांची नियुक्तीबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.

कृषिमंत्री श्री भरणे म्हणाले, विद्यापीठाच्या वर्ग क आणि ड वर्गातील मधील रिक्त पदांसाठी 2025 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. क वर्ग यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करताना गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, निवड आणि प्रतीक्षा यादीची प्रक्रिया केली जावी असे कृषिमंत्री यांनी यावेळी सांगितले. 2005 नंतर नियुक्त प्रकल्पग्रस्त कर्मचार्‍यांच्या पेन्शन मागणी बाबत सकारात्मक असून याबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाकडे कार्यवाही साठी पाठवण्यात यावा, अशी सूचना यावेळी दिली.

2025 च्या भरती प्रक्रियेमधील वर्ग ड पदांसाठी शासन नियमानुसार निवड प्रक्रिया राबवून 143 पदांवर नियुक्ती देण्यात आली. परंतु वर्ग क पदांमधील भरती प्रक्रियेसाठी नियमानुसार परीक्षा आयोजित करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. तसेच यातील निवड यादी व प्रतीक्षा यादी अंतिम होणे बाकी आहे, असे बैठकीत यावेळी सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून...

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण...