Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Dry Day: नाशिकसह २८ महापालिका क्षेत्रांसंदर्भार प्रशासनाचा मोठा निर्णय; सलग ३...

Maharashtra Dry Day: नाशिकसह २८ महापालिका क्षेत्रांसंदर्भार प्रशासनाचा मोठा निर्णय; सलग ३ दिवस राहणार ‘ड्राय डे’

नाशिक | Nashik
राज्यात २९ महापालिका क्षेत्रात निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मुंबईत भाजप विरूद्ध ठाकरे बंधू, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. अशातच निवडणूक आयोगाकडून सर्व प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहे. महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ५.३० वाजेपासून थंडावणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांकडून मतदारांना कुठलीही आमिष दिले जाऊ नये या हेतुने राज्यात १३ ते १६ जानेवारी या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१३ तारखेला प्रचाराच्या तोफा थंडावताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात ड्राय डे लागू होणार आहे. जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे मद्याची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल.

Municipal Elections 2026: अन्यथा तुमचे मत बाद होईल! १५ तारखेला मतदान कसे कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

निवडणुक काळात शांतता, सुरक्षितता, आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहे. मद्यपानाला बंदी घातल्याने मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणुक संबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल, यासाठी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यवसायिकांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

दै.‘देशदूत’आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांनी प्रदर्शन स्थळावर गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद...