Saturday, August 22, 2026
HomeनगरAhilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्यातील महायुती सरकारने मागील आठवड्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यात नगर जिल्ह्यातील एकट्या जिल्हा बँकेचे २ लाखांपर्यंत कर्ज असणारे १ लाख ८४ हजार तर नियमित कर्ज फेडणारे ३ लाख १५ हजार शेतकरी आहे. अशा या ४ लाख ९९ हजार शेतकऱ्यांना राज्यातील महायुती सरकारच्या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची शक्यता सहकार विभागाच्या सुत्रांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सरकारच्या या कर्जमाफीत जिल्ह्यातील मध्यम व दीर्घ मुदत कर्जदारांबाबत स्पष्टता नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत सहकार खाते व जिल्हा बँकेच्या वर्तुळात संभ्रम आहे. राज्यातील महायुतीच्या वतीने देण्यात येणारी कर्जमाफी ही ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारच्या कर्जमाफीवर काम सुरू होते. नगर जिल्ह्यात शेतीला अर्थ पुरवठा करणारी सर्वात मोठी आर्थिक संस्था म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा बँकेने या पूर्वीच राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्य थकीत कर्जाची आकडे आणि त्यांची संख्या याबाबतची माहिती ऑनलाईन सादर केलेली आहे. यात नगर जिल्ह्यात जवळपास २ लाख ७५ हजार शेतकऱ्यांचे शेती कर्ज थकीत असल्याचे जिल्हा बँकेच्या वतीने शासनाला कळवण्यात आले होते.

आता राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफीच्या घोषणेसह यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांना पिक कर्जासह ३० सप्टेंबरपर्यंत दोन लाखांपर्यंत थकीत कर्ज आणि शेतकऱ्यांची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे. यात जिल्हा बँकेकडे ३० सप्टेंबरअखेर दोन लाखांपर्यंत कर्ज थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही १ लाख ८४ हजार असून थकीत कर्जाची रक्कम ही १ हजार ६०० कोटी आहे. तसेच नियमित कर्जभरणारे आणि ५० हजारांच्या अनुदानास पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांच्या संख्या ३ लाख १५ हजारांपर्यंत असल्याचे जिल्हा बँक व सहकार विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यांत संपलेली असून लवकर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहकार विभागाकडून एकीकडे कर्जमाफीची तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. यात बँकेची निवडणूक आधी होणार की कर्जमाफी आधी होणार याकडे शेतकऱ्यांसह बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...