Saturday, June 6, 2026
HomeनगरAhilyanagar Crime : धारदार शस्त्रांचा धाक दाखवून तरूणाला लुटले

Ahilyanagar Crime : धारदार शस्त्रांचा धाक दाखवून तरूणाला लुटले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

निंबळक (ता. अहिल्यानगर) गावाच्या शिवारातील साईबन परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी चोरट्यांनी एका कार चालकाला धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदरची घटना 20 मे रोजी घडली असून सागर सिताराम तळेकर (वय 39, रा. निर्मलनगर, सत्कार कॉलनी, अहिल्यानगर) यांनी भितीपोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी त्यांनी 4 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सागर तळेकर हे रात्रीच्या सुमारास निंबळक शिवारातून आपल्या कारने घराकडे निघाले होते. दरम्यान, दोन विना नंबरच्या स्कुटीवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची कार अडवली. चोरट्यांनी तळेकर यांना लोखंडी चाकू, कुर्‍हाड, धारदार कटर आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मुद्देमाल बळजबरीने चोरून घेतला.

या लुटीमध्ये चोरट्यांनी फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी, गळ्यातील सोन्याचे बदाम, डिजिटल स्मार्ट घड्याळ आणि रोकड असा एकूण 30 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. चोरी केल्यानंतर संशयित आरोपींनी तळेकर यांना पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीमुळे तळेकर यांनी तात्काळ फिर्याद दिली नव्हती, मात्र मनस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जून २०२६ – जखम डोक्याला अन् पट्टी पायाला!

0
नीट पेपर फुटीच्या महाघोटाळ्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याभोवती निर्माण झालेले प्रश्नचिन्ह चिंताजनक आहे. तब्बल २२.७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करत वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न डोळ्यांत...