Tuesday, June 9, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर ठरला सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा!

Ahilyanagar : अहिल्यानगर ठरला सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा!

यापूर्वी होते काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व, आता भाजप नंबर वन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सहकार, कृषी, शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर आता सर्वाधिक आमदारांचा जिल्हा झाला आहे. कधी नव्हे एवढी संख्या आमदारांची वाढली आहे. यातून आमदार निधी अधिकचा मिळणारच आहे. शिवाय राजकीय ताकदही वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर प्राजक्त तनपुरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर जिल्ह्यातील आमदारांची एकूण संख्या 19 वर पोहोचली आहे. एकूण 19 आमदारांसह, आता राज्यात सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेला जिल्हा बनला आहे.

- Advertisement -

सध्या जिल्ह्यात विधानसभेचे 12 आणि विधान परिषदेचे 7 असे एकूण 19 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 9 आमदार असून, अजित पवार गटाचे 5, शिवसेनेचे 2, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा 1 आणि 1 अपक्ष आमदार आहे. ही संख्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. एकेकाळी या जिल्ह्यावर काँगेेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. पण भाजपाने आता त्याला सुरूंग लावत नंबर एक क्रमांक पटकावला आहे. अर्थात भाजपाचे बहुतांश आमदार हे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. आता ते या ना त्या कारणाने भाजपावाशी झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा) आणि अक्षय कर्डिले (राहुरी), असे चार भाजपाचे आमदार आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), काशिनाथ दाते (पारनेर) आणि संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर) असे चार आमदार आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेना विठ्ठल लंघे (नेवासा) आणि अमोल खताळ (संगमनेर), काँग्रेसचे हेमंत ओगले (श्रीरामपूर). तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार (कर्जत-जामखेड), असे एकूण 12 आमदार विधानसभेत आहेत.

राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने विधान परिषदेत अहिल्यानगर जिल्ह्याचे आणखी एक प्रतिनिधित्व वाढले आहे. यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), अमित गोरखे (श्रीगोंदा), सुनील कर्जतकर (जामखेड), विवेक कोल्हे (कोपरगाव), शिवाजीराव गर्जे (पाथर्डी) आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, असे सहा सदस्य जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. आता तनपुरेंच्या निवडीने हा आकडा सातवर पोहोचला आहे. त्यामुळे आमदारांची संख्या थेट 19 वर पोहचली आहे. एवढी आमदारांची संख्या यापूर्वी कधीही नव्हती.

पाच तालुक्यांना प्रत्येकी दोन तर कर्जत-जामखेडमध्ये तीन आमदार
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातंना प्रत्येकी दोन तर एका तालुक्याला तीन आमदार मिळाले आहेत. पाथर्डीमध्ये मोनिका राजळे आणि शिवाजीराव गर्जे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे, संगमनेरमध्ये अमोल खताळ आणि सत्यजित तांबे, श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते आणि अमित गोरखे, राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे, असे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर कर्जत-जामखेड तालुक्याने वेगळाच विक्रम केला आहे. प्रा. राम शिंदे, रोहित पवार आणि सुनील कर्जतकर, असे तीन आमदार या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.

ताज्या बातम्या

Sonai : राहुरी-शिंगणापूर रेल्वेमार्ग भूसंपादनाला विरोध

0
सोनई |वार्ताहर| Sonai राहुरी-शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकार्‍यांना बेल्हेकरवाडी येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत विरोध दर्शविला व मोजणी प्रक्रिया थांबवली. वाढत्या तणावामुळे यंत्रणेने जमिनीची कोणतीच...