अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar Highway) पांढरीपुल परिसरात वारंवार होणार्या अपघातांची मालिका टाळण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणार्या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू (Hotel Owner Death) झाल्याची घटना बुधवारी (दि. 5) पहाटे घडली. पांढरीपूल (Pandharipool) घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसुन झालेल्या अपघातात (Truck Accident) हॉटेल राधेश्यामचे मालक बंडू गणपत भवार ( वय 50 रा. पांढरीपूल, वांजोळी ता. नेवासा ) यांचा मृत्यू झाला. याबाबत सोनई पोलीस ठाण्यामध्ये (Sonai Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणार्या ट्रकचालकाचे (क्र. एम.एच. 41 जी. 7017) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक (Truck) रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. हॉटेल मातोश्री व हॉटेल राधेश्याम भेळ सेंटर या दोन हॉटेलचे मोठे नुकसान झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास बंडू भवार आपल्या हॉटेलमध्ये आवराआवर करत असताना ट्रक अंगावर आल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला. ट्रकने हॉटेल मातोश्रीपासून तीन मोटरसायकल फरफटत नेत हॉटेल राधेशामच्या भिंतीला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकींचे (Bike) देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी पथकासह दाखल झाले.
दरम्यान, पांढरीपुल (Pandharipool) येथील अपघातांची मालिका टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन (Movement Hint) करण्याचा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पांढरीपुल परिसरात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून, पांढरीपुल, पांगरमल, खोसपुरी, वांजोळी येथील ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही येथे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अनेक निष्पापांचे बळी जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मयत भवार हे पांढरीपुल परिसरात अपघात टाळण्यासाठी नेहमीच सक्रिय राहत असत. संतप्त ग्रामस्थांनी मयत भवार यांच्यावरील अंत्यसंस्कार (Funeral) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात (Public Works Department) करणार असल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.