Saturday, May 9, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर शहर उपअधीक्षकपदी टिपरसे

Ahilyanagar : अहिल्यानगर शहर उपअधीक्षकपदी टिपरसे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर शहर उपअधीक्षक पदावर गंगाखेड (जि. परभणी) येथील उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच केलेल्या बदल्यांमध्ये राज्यातील 16 उपअधीक्षकांची बदली करण्यात आली असून, 15 परिवीक्षाधीन उपअधीक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केलेले उपअधीक्षक संतोष खाडे यांची बदली मेहकर (जि. बुलढाणा) येथे झाली आहे.

- Advertisement -

शहर उपअधीक्षक अमोल भारती यांची बदली शिर्डी विभाग उपअधीक्षकपदी झाल्यानंतर शहरातील हे पद रिक्त होते. या दरम्यान ग्रामीण उपअधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे शहर उपअधीक्षक पदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. संतोष खाडे यांचे नाव आघाडीवर असले तरी अखेरीस अनुभवी अधिकारी दिलीप टिपरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी उपअधीक्षक टिपरसे यांच्यावर राहणार आहे. खून, खूनाचा प्रयत्न, दोन समाजांतील तणाव, विविध आंदोलन, मोर्चे यामुळे शहर उपविभाग कायम चर्चेत असतो. या सर्व आव्हानात्मक परिस्थितीत शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे कठीण काम नव्याने आलेल्या उपअधीक्षक टिपरसे यांच्यासमोर आहे.

ताज्या बातम्या

निदा

Asaduddin Owaisi: सुक्षिशित मुस्लीम मुलामुलींना…;निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवैसींचं भाष्य, म्हणाले,...

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarनाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती...