Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : संगमनेर येथे 1700 किलो गोमांस पकडले

Crime News : संगमनेर येथे 1700 किलो गोमांस पकडले

11.10 लाखांचा मुद्देमाल जप्त || चार आरोपी ताब्यात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावर गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या पिकअप वाहनावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.5) छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 1700 किलो गोमांस आणि पिकअप वाहन असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल डोके, अमृत आढाव, योगेश कर्डिले व भगवान धुळे यांचे पथक संगमनेर शहर परिसरात माहिती घेत असताना गोमांस विक्रीसाठी पिकअपमधून नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुकेवाडी ते समनापूर रस्त्यालगत असिफ शेख यांच्या कांद्याच्या चाळीजवळ पंचांसमक्ष कारवाई केली. तेथे पांढर्‍या रंगाचे पिकअप वाहन आढळून आले.

वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. याप्रकरणी अब्दुलहमीद अहमद कुरेशी (वय 23, रा. जमजम कॉलनी, संगमनेर), कलामुद्दीन मिज्जन खान (वय 28, रा. संगमनेर), वाहनचालक अरबाज फिरोज खान (वय 24, रा. सिद्धार्थनगर, ता. शिरुर, जि. पुणे) आणि कैश शबनूर इनामदार (वय 23, रा. संजयनगर, श्रीरामपूर) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईत 5 लाख 10 हजार रुपये किमतीचे 1700 किलो गोमांस आणि 6 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन (क्रमांक एमएच.17, बीडी.4661) असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...