Wednesday, November 18, 2026
HomeनगरNewasa : अहिल्यानगर जिल्ह्याकरिता दीड लाख कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांचे लक्ष्य

Newasa : अहिल्यानगर जिल्ह्याकरिता दीड लाख कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांचे लक्ष्य

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून जलशक्ती अभियान-कॅच द रेन20260 अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा ग्रामीण व महानगरपालिका विभागात एकूण 34 लाख 83 हजार 940 कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांची कामे करावयाची आहेत. त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्याकरिता 1 लाख 58 हजार 656 कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचनांचे लक्ष्य देण्यात आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात मजलशक्ती अभियानः ‘कॅच द रेन 2026’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या मे 2027 पर्यंत महाराष्ट्र राज्यास एकूण 34 लाख 83 हजार 940 कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचना उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

उद्भवलेल्या अल निनो परिणामातून दुष्काळी परिस्थिती पाहता जलसंधारण व कृत्रिम भूजल पुनर्भरण कामे युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या दि. 20 मे 2026 च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय व महानगरपालिका स्तरावरील समित्या गठीत केल्या आहेत. राज्याच्या या एकूण 34 लाख 83 हजार 940 लक्ष्याचे शास्त्रीय पद्धतीने सर्व जिल्हे व 29 महानगरपालिकांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ‘रिचार्ज शाफ्ट्स’, ‘हायड्रोलिक फॅक्चरिंग’ आणि इतर तांत्रिक भूजल पुनर्भरणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत.

ग्रामविकास विभागामार्फत गाव तलाव, तळी पुनर्जीवन आणि मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात शोषखड्डे व जलसंधारणाची कामे करावीत. मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट नाला बंधारे मातीचे बंधारे व पाणलोट क्षेत्र विकासावर भर द्यावा. कृषी विभागामार्फत शेततळी, सिंचन विहिरी पुनर्भरण आणि शेतकरी स्तरावरील जलसंधारणाला चालना द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागातील आपल्या अधीनस्थ सर्व जुन्या व नवीन शासकीय इमारतींवर (शाळा, दवाखाने, कार्यालये) छतावरील पाणी साठवण यंत्रणा व शोषखड्डे बसवण्यावर भर द्यावा. वन विभागामार्फत वनपरिसरात तसेच ग्रामीण भागात ‘वनराई बंधारे’ सिमेंट नाला बंधारे आणि तळी यांसारख्या माध्यमांतून भूजल पुनर्भरणाची कामे करावीत. जलसंपदा विभागामार्फत प्रमुख तलाव, धरणे आणि नदी पुनर्जीवनाच्या कामांमध्ये समन्वय साधावा.

महानगरपालिका आयुक्तांनी शहरी भागात सर्व नवीन बांधकाम परवानग्यांमध्ये छतावरील पाणी साठवण यंत्रणा (रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग) बसवणे अनिवार्य असल्याची कडक अंमलबजावणी करावी आणि या नवीन संरचनांची नोंद लक्ष्यापोटी करावी. नगरविकास, पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने सर्व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी रुफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टींग आणि शोषखड्डे तात्काळ पूर्ण करावेत.

शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण सुधारीत लक्ष्य 1लाख 58 हजार 656 ़इतके दिले आहे. 39 हजार 664 इत्तके भूजल सर्वेक्षण, ग्रामविकास साठी 31 हजार 732, मृद व जलसंधारणसाठी 23 हजार 798, कृषी साठी 23 हजार 798, सार्वजनिक बांधकामसाठी सार्वजनिक बांधकामसाठी 15 हजार 866, वन विभागासाठी 15 हजार 866 तर जलसंपदासाठी 7 हजार 932 इतके उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी 3 हजार 300 इतके उद्दीष्ट आहे.

ताज्या बातम्या

अंबड पोलिसांची टवाळखोर व मद्यपींवर कारवाई

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, टवाळखोरी आणि मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सायंकाळी...