Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअंबड पोलिसांची टवाळखोर व मद्यपींवर कारवाई

अंबड पोलिसांची टवाळखोर व मद्यपींवर कारवाई

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

- Advertisement -

परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, टवाळखोरी आणि मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सायंकाळी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान टवाळखोरी व मद्यपान करणाऱ्या २७ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या अन्वये कारवाई करण्यात आली.

सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती चौक, कामटवाडे, उपेंद्रनगर, पाथर्डी फाटा, लेखानगर आणि लक्ष्मीनगर या ठिकाणी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. यावेळी संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच नाकाबंदी दरम्यान २७ जणांवर स्टॉप अँड सर्च अंतर्गत कारवाई करण्यात आली.

या मोहिमेसाठी अंबड पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आणि १९ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Crime News : चांदबिबी महालाजवळ युवक-युवतीला लुटले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चांदबिबी महालाजवळ बारदरी (ता. अहिल्यानगर) गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर युवकाला लोखंडी हातोड्याने मारहाण करून त्याच्या मैत्रिणीच्या हातातील चांदीची अंगठी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना...