Wednesday, November 4, 2026
HomeनगरParner : जिल्हा बँक कारखानदारांची नव्हे शेतकर्‍यांचीच

Parner : जिल्हा बँक कारखानदारांची नव्हे शेतकर्‍यांचीच

विजयाचा जल्लोष अन् विरोधकांना इशारा,आरबीआयची भेट घेणार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

दुसर्‍यांना विकत घ्या, दादागिरी करा, सहलीला घेऊन जा; पण आमचा एकच नेता निलेश लंके आहे, हे जनतेने दाखवून दिले, अशा शब्दांत नवनिर्वाचित संचालक खासदार निलेश लंके यांनी विरोधकांना सुनावले. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या पारनेर सोसायटी मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बँक शेतकर्‍यांची असताना तिच्या पैशांचा वापर कारखानदारांसाठी झाला. बँकेतील अनियमिततेचा हिशेब तपासून चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करू, असे लंके यांनी सांगितले.

- Advertisement -

बँकेच्या कारभाराबाबत लवकरच रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत बँक कारखानदारांची होती. आता माझ्यासारखा मातीतला माणूस बँकेत पोहोचला आहे. यापुढे बँक शेतकर्‍यांचीच राहील. सभापती राम शिंदे, थोरात साहेब आणि सर्वांना सोबत घेऊन कारभार करू असेही ते म्हणाले. विजयाच्या जल्लोषात लंके यांनी शेरोशायरीच्या शैलीत विरोधकांना टोला लगावला. जंगलात अनेक प्राणी असतात; पण राजा सिंहच असतो. सिंहाची शिकार करण्यासाठी सगळे एकत्र आले, तरी सिंह तो सिंहच आणि राजा तो राजाच असतो. तो जनतेचा राजा असतो, असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला समर्थकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने...