Friday, October 30, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर जमावबंदी

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर जमावबंदी

मतदान व मतमोजणी केंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. तसेच अहिल्यानगर शहरातील अमरज्योत लॉन्स, नगर-कल्याण रोड, बायपास चौक, नेप्ती येथे मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी, हा या आदेशामागील उद्देश आहे.

उमेदवारांसह शस्त्रे बाळगण्यास मनाई
मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, उमेदवारांसह इतर कोणत्याही व्यक्तीला या परिसरात शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 2 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू असलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचा अडसर की जानेवारीत धडाका?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात असणारी दुष्काळी स्थिती यामुळे स्थानिक...