Tuesday, September 22, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

Ahilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

28 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेनंतर हालचालींना वेग येण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चा सुरू असली, तरी निवडणूक कार्यक्रमाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. येत्या 28 सप्टेंबरला बँकेची सर्वसाधारण सभा असून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 15 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाकडून निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे. बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात आल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.

प्रारूप यादीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, शेतीपूरक संस्था तसेच बिगरशेती संस्थांचा समावेश होता. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, माघारीची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द होणे, असे पुढील टप्पे असतील.
दरम्यान, जिल्हा बँकेची 28 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे.

या सभेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहकार विभागाकडून निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सहकार व राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांकडून हालचाली सुरू असल्या, तरी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : पाणलोटात पाऊस, भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात रविवारी रात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नवीन पाण्याची जोरदार आवक होत असल्याने...