Tuesday, November 17, 2026
HomeनाशिकNashik Crime News :​ मॉर्फिंगची भीती विरुद्ध महाराष्ट्र सायबर; डीपफेकच्या जाळ्याला घाबरू...

Nashik Crime News :​ मॉर्फिंगची भीती विरुद्ध महाराष्ट्र सायबर; डीपफेकच्या जाळ्याला घाबरू नये, ब्लॅकमेलर्सविरोधात लढा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डिजिटल माध्यमांच्या (Digital Media) वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारांनी आता महिला व तरुण-तरुणींना लक्ष्य करण्यासाठी मॉर्फिंग आणि डीपफेकची शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. खाजगी छायाचित्र किंवा व्हिडिओ मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायची आणि बदनामीच्या भीतीपोटी हजारो-लाखो रुपयांची खंडणी उकळायची, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या समस्येची दखल घेत महाराष्ट्र सायबरने नागरिकांना अशा चाेरट्यांविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

​सायबर चाेरटे (Cyber Thieves) चलाखीने सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून नागरिकांचे वैयक्तिक फोटो मिळवतात. त्यानंतर तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ते फोटो अयोग्य पद्धतीने मॉर्फ (विकृत) केले जातात. ‘तुझे फोटो व्हायरल करून आयुष्य उद्ध्वस्त करू’, अशी धमकी देत व्हॉट्सॲपवर क्यूआर कोड पाठवून किंवा रोख रकमेची मागणी केली जाते. सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक नागरिक पोलिसांत जाण्याऐवजी गुन्हेगारांच्या मागण्या पूर्ण करतात, ज्यामुळे अशा गुन्हेगारांचे धाडस आणखी वाढते.

अशा प्रकारच्या धमक्या आल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याची किंवा मानसिक दबावाखाली येण्याची गरज नाही. यात कोणतीही चूक नसून गुन्हा समोरच्या ब्लॅकमेलरचा (Blackmeling) आहे. बदनामीच्या भीतीने गुन्हेगारांना एकही रुपया देऊ नका, कारण एकदा पैसे दिल्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रमाण आणखी वाढू शकते, असे सायबर विभागाने स्पष्ट केले आहे.

​काय करावे आणि कुठे संपर्क साधावा?

तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही मॉर्फिंग किंवा डीपफेकच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात असेल, तर अजिबात घाबरू नका. ब्लॅकमेलरच्या धमक्यांना बळी न पडता मानसिक ताण घेऊ नका. कोणत्याही खात्यावर किंवा क्यूआर कोडवर रक्कम ट्रान्सफर करू नका. आलेले मेसेज, चॅट आणि नंबर सुरक्षित ठेवा. सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवा.

ताज्या बातम्या

स्वयंसेवी

Nashik News: स्विकृतनंतर आता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधित्वाची संधी; महापालिकेच्या सहा विभागांत...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांमधील इच्छुकांच्या नाराजीचे नवे आव्हान निर्माण झाले होते, स्वीकृत नगरसेवकपदासाठी शेकडो जण...