Tuesday, November 17, 2026
HomeनाशिकNashik News : ​फटाक्यांच्या आतषबाजीत विवाहितेचा मृत्यू; ​महात्मानगर परिसरातील घटना

Nashik News : ​फटाक्यांच्या आतषबाजीत विवाहितेचा मृत्यू; ​महात्मानगर परिसरातील घटना

साडीने पेट घेतल्यानंतर उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीच्या (Diwali) सणासुदीत आणि त्यानंतरही सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी एका विवाहितेच्या जिवावर (Woman Dies) बेतली आहे. लक्ष्मीपूजन व मुख्य दिवस उलटून गेल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी फटाके फोडण्याचा सिलसिला सुरूच असून, या निष्काळजीपणामुळे २७ वर्षीय विवाहिता दिव्या ओमकार चव्हाण (रा. पूजा व्हेरीकेट सोसायटी, आयटीआय सिग्नलजवळ) यांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

फटाके फोडत असताना अचानक साडीने पेट घेतल्याने भाजलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे.चव्हाण कुटुंबिय या सोसायटीच्या आवारात वॉचमन म्हणून वास्तव्यास होते. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दिव्या चव्हाण या आपल्या घरासमोर फटाके फोडत होत्या. यादरम्यान अचानकपणे त्यांच्या साडीने पेट घेतला. यात तोंडापासून ते गुडघ्यापर्यंत गंभीर स्वरूपात भाजल्या.

घटनेनंतर कुटुंबियांनी ९ नोव्हेंबर रोजी नाशिकच्या जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मागील काही दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर १५ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी वळवी यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.

ताज्या बातम्या

उध्दव

Uddhav Thackeray: “शाहाचं ब्रह्मवाक्य नाही, तर ते…”; उध्दव ठाकरेंची अमित शाहांवर...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल...