Wednesday, September 2, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 123 हरकती

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून सर्वाधिक 123 हरकती

अखेरच्या दिवशी 204 तर एकूण हरकतींची संख्या 238 वर पोहचली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 204 हरकती आणि सुचना तर एकूण एकूण 238 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 123 हरकती एकट्या संगमनेर तालुक्यातून दाखल झाल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सुनावणी होवून अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंदाज 15 ते 20 दिवसांनी जाहीर होईल. दरम्यान, यंदा निवडणुकीसाठी बँकेचे 3 हजार 677 मतदार आहेत. त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नाहीत. 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर 15 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

तालुकानिहाय दाखल हरकतीमध्ये नेवासा 14, अकोले 14, पारनेर 10, जामखेड 7, कर्जत 10, श्रीगोंदा 12, नगर तालुका 12, राहुरी 3, श्रीरामपूर 5, राहाता 9, पाथर्डी 6, शेवगाव 4 कोपरगाव 9, संगमनेर 123 अशा एकूण एकूण 238 दाखल आहेत. जिल्हा बँकेच्या एकूण हरकतींपैकी निम्म्याहून अधिक हरकती संगमनेर तालुक्यातून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता निवडणूक प्राधिकरणाकडून या सर्व हरकतींची छाननी व सुनावणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पुन्हा ठराव घेण्याचे खंडपीठाचे आदेश
पाथर्डी तालुक्यातील एका सेवा संस्थेच्या ठरावाचे प्रकरण थेट छत्रपती संभाजीनगर खंडपिठात पोहचले. न्यायालयात या प्रकरणावर चर्चा होवून दरम्यान याचिकाकर्त्याच्यावतीने पुन्हा ठराव घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खंडपिठात जाणारे पाथर्डी तालुक्यातील हे प्रकरण बहुदा पहिले प्रकरण ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेशोत्सवापूर्वीच नव्या शिक्षकांचा श्री गणेशा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्यासाठीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण आयुक्तालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार उमेदवारांच्या...