Monday, November 30, 2026
Homeक्राईमCrime News : दांपत्य हॉस्पिटलमध्ये जाताच कारमधील दागिने, रोकड लंपास!

Crime News : दांपत्य हॉस्पिटलमध्ये जाताच कारमधील दागिने, रोकड लंपास!

पाच तोळ्याचा ऐवज लांबविला || कोतवालीत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील फाटके पाटील हॉस्पिटलसमोर कार उभी करून पती-पत्नी उपचारासाठी गेले असताना चोरट्याने कारचा दरवाजा व काच उघडून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, 12 भारचे चांदीचे पैंजण आणि 40 हजार रूपयांची रोकड असा ऐवज होता. शनिवारी (28 नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी सिंधू उत्तम कळमकर (वय 43, रा. शिक्षक कॉलनी, श्रीगोंदा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंधू कळमकर या शनिवारी पती उत्तम यांच्यासह कारने श्रीगोंदा येथून अहिल्यानगरला भावाला भेटण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पर्समध्ये ठेवली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या अहिल्यानगरमध्ये पोहोचल्या. दरम्यान, सिंधू यांची अचानक तब्येत बिघडल्याने पतीने फाटके पाटील हॉस्पिटलसमोर कार उभी केली. घाईगडबडीत त्यांनी दागिने व रोकड असलेली पर्स कारच्या मागील सीटवर ठेवली आणि दोघेही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले.

उपचार घेऊन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पती-पत्नी कारजवळ परत आले असता कारची काच उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मागील सीटवर ठेवलेली पर्सही गायब होती. त्यांनी कारमध्ये पर्सचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. चोरट्याने कारचा दरवाजा व काच उघडून पर्समधील 17 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमची अंगठी, सात ग्रॅमचे सोन्याचे जुबे, सहा ग्रॅमचे सोन्याचे जुबे, सहा ग्रॅमचे दोन सोन्याचे वेल, पाच ग्रॅमचे सोन्याचे मणी व वाट्यांचे गंठण, चांदीचे 12 भाराचे पैंजण आणि 40 हजार रूपयांची रोकड असा एकूण 2 लाख 54 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : कोंची शिवारातील अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

0
आश्वी |वार्ताहर| Ashwi कोल्हार-संगमनेर राज्य महामार्गावरील कोंची (ता. संगमनेर) शिवारात रविवारी (दि. 29) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण...