अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
1 जानेवारी 2022 पासून रिक्त असणार्या नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवार केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. निवडणूक जाहीर होताच नगर जिल्ह्यात निवडणुकीसाठी मतदान होवून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोणतीच्या नवीन विकास कामे, धोरणात्मक निर्णय याची घोषणा करता येणार नाही. दरम्यान, या आचारसंहितेचा पहिला फटका जिल्हा परिषद कर्मचार्यांचा बदल्यांना बसला आहे. कर्मचार्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याची जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होवून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत नगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात नवीन विकास कामे, धोरणात्मक निर्णय याची घोषणा करता येणार नाही. तसेच लोकप्रतिनिधी यांना शासकीय बैठका घेता येणार नाहीत. तसेच आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांची आज मंगळवार (19) रोजी होणारी बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
यापूर्वी देखील जिल्हा परिषद कर्मचार्यांचा बदल्या स्थगित करण्यात आल्या होत्या. जनगणनेच्या कामासाठी ज्याज्या शासकीय विभागातील संवर्गातील कर्मचार्यांनी नियुक्त झालेली आहे. त्या संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महिला बालकल्याण, अर्थ, पशूसंवर्धन आणि अर्थ विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होणार होत्या. मात्र, त्यांना देखील आता स्थगिती करण्यात आली आहे.




