Saturday, September 26, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात आता 14 तक्रार निवारण समिती

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात आता 14 तक्रार निवारण समिती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बियाणे, खते आणि कीटकनाशकांबाबतच्या तक्रारींचे जलद गतीने निवारण करण्यासाठी व शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याच पार्श्वभूमीवर तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वी असणार्‍या केवळ 4 उपविभागीय समित्यांऐवजी आता 14 तालुक्यांमध्ये 14 स्वतंत्र समित्या अस्तित्वात येणार आहेत.

- Advertisement -

या समितीकडे शेतकर्‍यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पुढील सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासणी केली जाईल आणि अहवाल अंतिम केला जाईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यासह राज्यात खरीप हंगामात बियाण्यांची उगवण क्षमता, तसेच खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी येतात. अशा तक्रारींचे तातडीने आणि प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी शासनाने ही सुधारित रचना लागू केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

ताज्या बातम्या