Monday, September 7, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यात 70 महसूल मंडळात दमदार हजेरी

Ahilyanagar : जिल्ह्यात 70 महसूल मंडळात दमदार हजेरी

तिसर्‍या दिवशी नगर जिल्ह्यात भिज पाऊस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यात रविवारपासून सलग तीन दिवस भिज पाऊस होत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सोमवार (दि.6) रोजी 70 महसूल मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली असून यात सर्वाधिक पाऊस हा अकोले तालुक्यातील रूभोंडीत 84 मि.मी., अकोले 83 मि.मी., पारनेर 60 मि.मी, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी 54 मि.मी. आणि कर्जत तालुक्यात भांबोरा या ठिकाणी 53 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दमदार भिज पाऊस होत आहे. जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी 70 मंडळात गेल्या 24 तासांत 20 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक अकोले तालुक्यातील मंडळाचा समावेश असून नगर दक्षिणेत पारनेर तालुक्यातील मंडळाचा समावेश आहे. यासह अन्य मंडळात सलग तिसर्‍या दिवशी हजेरी आहे. या पावसामुळे खरीप हंगामात पेरण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत. त्या भागातील पिकांचा मोठा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात सावेडी आणि कापूरवाडी मंडळात प्रत्येकी 23 मि.मी., केडगाव 20 मि.मी., चास 23 मि.मी., रुईछत्तीशी 24 मि.मी., नेप्ती 31 मि.मी., पारनेर 60 मि.मी., सुपा 34 मि.मी., वाडेगव्हाण 45 मि.मी., वडझिरे 47 मि.मी., निघोज 44 मि.मी., टाकळी 22 मि.मी., पळशी 22 मि.मी., कान्हूर पठार 31 मि.मी., जवळा 23 मि.मी., आळकुटी 25, श्रीगोंदा 43 मि.मी., काष्टी 54 मि.मी., मांडवगण 26 मि.मी., बेलवंडी 34 मि.मी., पेडगाव 54 मि.मी., चिंभळा 42 मि.मी., देवदैठण 44 मि.मी., कोळगाव 43 मि.मी., लोणी व्यंकनाथ 39 मि.मी., भानगाव 32 मि.मी., आढळगाव 42 मि.मी., कर्जत 35 मि.मी., राशीन 38 मि.मी., भांबोरा 52 मि.मी., कोंभळी 34 मि.मी., मिरजगाव 34.8 मि.मी., माहिजळगाव 32 मि.मी., कुळधरण 46.8 मि.मी., वालवड 31 मि.मी., खेड 53 मि.मी., कोरेगाव 36 मि.मी., आरणगाव 27 मि.मी., खर्डा 26 मि.मी., नान्नज 27 मि.मी., जामखेड 21 मि.मी., सात्रळ आणि ताराबाद 20 मि.मी., अकोले 84 मि.मी., विरगाव 64 मि.मी., समशेरपूर 64 मि.मी., राजूर 60 मि.मी., साकीरवाडी 60 मि.मी., शेंडी 60 मि.मी., कोतूळ आणि ब्राम्हणवाडा 40 मि.मी., वाकी 60 मि.मी., रुंभोडी 84 मि.मी., कोपरगाव 22 मि.मी., रवंदे 22 मि.मी., सुरेगाव 22 मि.मी., दहेगाव बोलका 35 मि.मी., पोहेगाव 68 मि.मी., कोकमठाण 22 मि.मी., श्रीरामपूर 35 मि.मी., बेलापूर 24 मि.मी., उंदिरगाव 20 मि.मी., राहाता 44 मि.मी., शिर्डी 35 मि.मी., लोणी 44 मि.मी., बाभळेश्वर 44 मि.मी., पुणतांबा 44 मि.मी., अस्तगाव 44 यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; पुण्यात मोर्चा, रोहित पवारांचा सरकारवर...

0
पुणे । Pune महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आज पुण्यातील रस्त्यांवर तरुणाईचा प्रचंड असंतोष उफाळून आला. लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि MPSC...