Thursday, November 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएकीकडे ठाकरे गट आक्रमक तर दुसरीकडे शायना एनसींनी मागितली माफी; पोस्ट करत...

एकीकडे ठाकरे गट आक्रमक तर दुसरीकडे शायना एनसींनी मागितली माफी; पोस्ट करत म्हणाल्या, आयुष्यभर काळजाच्या कोपऱ्यात…

मुंबई | Mumbai
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाच्या नेत्या शायना एनसींवर सध्या टीकेची झोड सुरू आहे. सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडण्याच्या नादात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. शायना एनसीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. फोटो फाडल्यानंतर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण देत मी बाळासाहेब ठाकरे यांचा नाही तर मणिशंकर अय्यर यांचा पोटो फाडला असल्याचे सांगितले होते. आता या सर्व घडामोडींनंतर शायना एनसी यांनी माफी मागितली आहे.

शिवसेना नेत्या शायना एन सी यांनी सोशल मिडीयावर मोठी पोस्ट टाकत फोडो फाडल्याप्रकरणी माफी मागितली आहे. शायना एनसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांच्याकडून अनावधानाने ही चूक घडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना भेटायला बोलावले होते. या सगळ्यानंतर आता शायना एनसी यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शायना एन सींनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.

टीसीएस प्रकरणः हॉटेल्स, अन् वकालतनाम्याचे गूढ; माजी खासदार जलील यांची आज न्यायालयात हजेरी

बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.

काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व. मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते. बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.

बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!
सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!
जय हिंद, जय महाराष्ट्र! @Shivsenaofc— Shaina Chudasama Munot (@ShainaNC) November 19, 2026

कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.

बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!

सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!

जय हिंद, जय महाराष्ट्र!

ताज्या बातम्या

टीसीएस

टीसीएस प्रकरणः हॉटेल्स, अन् वकालतनाम्याचे गूढ; माजी खासदार जलील यांची आज...

0
नाशिक | प्रतिनिधीशहरातील टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्न (Sexual Harresement Case) केल्याप्रकरणाचा तपास आता मूळ गुन्ह्यापुरता मर्यादित न राहता,...