Thursday, November 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: शायना एनसींच्या अडचणी वाढणार? संजय राऊतांनी थेट फडणवीसांकडे केली कारवाईची...

Sanjay Raut: शायना एनसींच्या अडचणी वाढणार? संजय राऊतांनी थेट फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मुंबई | Mumbai
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या फाडण्यावरुन सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी छायाचित्राच्या वादावर माफी मागितली असली, तरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. केवळ माफी मागून हा विषय संपणार नाही, संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून शायना एनसी यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेबांच्या छायाचित्राचा अवमान हा गंभीर विषय असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी मांडली आहे.

फक्त पुस्तक फाडण्याच्या निमित्ताने बाळासाहेबांचा फोटो घटनास्थळी का आणला? असा सवालही त्यांनी केला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जात असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनादेखील महाराष्ट्राने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे, असे म्हणत भाजपवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला.

- Advertisement -

हा प्रकार अनावधानाने झालेला नाही
घडलेल्या घटनेनंतर शायना एनसी यांनी जाहीर माफी मागितली. पण यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “जर तुम्हाला पुस्तक फाडायचे होते किंवा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडायचा होता, तर अय्यर यांचा स्वतंत्र फोटो आणायचा होता. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो प्रत्येकासमोर का ठेवण्यात आला? हा प्रकार अनावधानाने झालेला नसून बाळासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच तो फोटो आणला गेला होता.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

एकीकडे ठाकरे गट आक्रमक तर दुसरीकडे शायना एनसींनी मागितली माफी; पोस्ट करत म्हणाल्या, आयुष्यभर काळजाच्या कोपऱ्यात…

माफी मागणे ही केवळ पळवाट
खासदार संजय राऊत म्हणाले की, “हे लोकं कालपर्यंत AI चा खोटा फोटो दाखवून ‘आम्ही फाडलेच नाही’ असा दावा करत होते. मात्र, शिवसैनिक आणि मराठी जनतेचा उद्रेक पाहिल्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माफी मागितली. माफी मागणे ही केवळ पळवाट असून राज्यभरात शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच राहणार आहे,” असे म्हणत टीका केली. “अमित शहांच्या मर्जीने नेमलेले नेते स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवतात, मग त्यांच्याच पक्ष कार्यालयात बाळासाहेबांचा फोटो फाडला जात असताना त्यांनी त्या 5 जणांवर काय कारवाई केली? त्यांची पक्षातून हकालपट्टी का केली नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विकट हास्याचे भाव त्या पाच जणांच्या चेहऱ्यावर
दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कौरव जसे विकट हास्य करत होते, त्या विकट हास्याचे भाव त्या पाच जणांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ते सर्व कधीकाळी आमच्या शिवसेनेतील लाभार्थी होते. शिवसेनेसाठी त्यांचं काही योगदान नव्हतं, तरीही ते लाभार्थी होते. तो फोटो फाडण्यासाठीच आणला होता. पुस्तक फाडायचं होतं. मग फोटो का आणला? कशासाठी आणला? आणायची गरज नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.

सावरकरांच्या विषयावर नंतर बोलू
वीर सावरकरांच्या विचाराशी त्या पाच जणांचा काडीमात्र संबंध नाही. सावरकरांच्या विषयावर नंतर बोलू. शिंदेंनी विषय भरकटवू नये. आम्ही बघू. आम्ही सावरकरांवर भूमिका घेत आलो आहोत, त्यात बदल नाही. सोनिया गांधींच्या पुस्तकात आक्षेपार्ह असेल तर आम्ही त्यावर बोलू. पण तुम्ही बाळासाहेबांचा फोटो नेलाच कशाला? फाडायलाच नेला ना? या बाईला राज्यसभेवर पाठवणार होते. हे यांचे शिलेदार आहेत. त्यांना बाळासाहेबांवर किंचित श्रद्धा आणि आस्था नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

ताज्या बातम्या

केमीकलयुक्त

Nashik News: केमीकलयुक्त पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास; कारवाई...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीअंबड औद्योगिक (Ambad MIDC) वसाहतीलगत असलेल्या दत्तनगर (Datta Nagar) परिसरातील मारुती संकुल येथील नैसर्गिक नाल्यात काही कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी(Non Treated Chemical...