Thursday, November 19, 2026
Homeनाशिकटीसीएस प्रकरणः हॉटेल्स, अन् वकालतनाम्याचे गूढ; माजी खासदार जलील यांची आज न्यायालयात...

टीसीएस प्रकरणः हॉटेल्स, अन् वकालतनाम्याचे गूढ; माजी खासदार जलील यांची आज न्यायालयात हजेरी

नाशिक | प्रतिनिधी
शहरातील टीसीएस कंपनीतील (Nashik TCS Case) तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्न (Sexual Harresement Case) केल्याप्रकरणाचा तपास आता मूळ गुन्ह्यापुरता मर्यादित न राहता, मुख्य संशयिताला वाचवण्यासाठी उभारलेल्या रसद पुरवठा साखळीपर्यंत (लॉजिस्टिक नेटवर्क) येऊन पोहोचला आहे.

इम्तियाज जलील हे नाशिक सत्र न्यायालयात हजर राहणार
मुख्य संशयित निदा एजाज खान हिला पसार काळात केवळ एका खोलीतच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा उलगडा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) (SIT) तपासात झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (दि. १९) माजी खासदार तथा एमआयएम नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे नाशिक सत्र न्यायालयात व्यक्तिशः हजर राहणार आहेत. निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पडद्यामागे वेगाने हालचाली घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यावेळी एमआयएमचे नगरसेवक संशयित मतीन पटेल आणि माजी खासदार संशयित इम्तियाज जलील यांच्यात झालेला संवाद पोलिसांच्या हाती लागला आहे.

- Advertisement -

पडसाद : सुशासन म्हणजे काय रे भौ

और एक वकालतनामा रेडी रख
‘साहब… निदा और उसके फॅमिली को नाशिक पुलिस ले गई हैं…’ अशी माहिती पटेल यांनी दिल्यावर जलील यांनी ‘हाँ, मतीन तुम अभी कुछ दिन के लिए शांत हो जा… और एक वकालतनामा रेडी रख’ असा सल्ला दिल्याचे सूत्रांकडून समजते. हे रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुरावे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात समाविष्ट केले आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका अविवाहित पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सहकारी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होताच निदा पसार झाली होती. तिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरातील नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हानिफ शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सखोल चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचाही सहसंशयित म्हणून समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, निदाला पसार काळात मदत केल्याप्रकरणी तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशीलाही पोलिसांनी सहसंशयित केले.

न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवला असून, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दाखल केलेले दुसरे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयाने पटलावर घेतले असून, त्यावर गुरुवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे. सध्या प्रमुख संशयित दानिश शेख वगळता उर्वरित सर्व संशयित सशर्त जामिनावर बाहेर आहेत.

पुरवणी दोषारोपपत्रातील ११ संशयित
मूळ संशयित: दानिश शेख (बलात्कार व धर्मांतर प्रयत्न), तौसिफ अत्तार (विनयभंग व धर्मांतर प्रयत्न) आणि निदा एजाज खान (धमर्मांतर प्रयत्न).
राजकीय व इतर आश्रयदाते :
माजी खासदार इम्तियाज जलील, नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख आणि सादिक बशिर खान.
कौटुंबिक सहसंशयित: वडील एजाज बशिर खान, आई निलोफर एजाज खान, भाऊ महंमद एजाज खान आणि मावशी नूरजहाँ शेख.

ताज्या बातम्या

पडसाद : सुशासन म्हणजे काय रे भौ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय जनता पक्षाने नुकतेच सुशासन प्रकोष्ठ म्हणजेच गुड गव्हर्नन्स समितीच्या पदाधिकार्‍यांची घोषणा केली. या समितीची कार्यकक्षा...